सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये - कृषी सभापती गोविंद चिलकुरे.
सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये : कृषी सभापती गोविंद चिलकुरे
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून, सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याची भावना लातुर जि.प.चे कृषी सभापती गोविंद चिलकुरे यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील येरोळ येथील जि.प. प्रशालेमध्ये आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच अतुल पाटील गंभीरे , मगेंश पाटील , सतिस सिंदाळकर , माजी सभापती शाम सिंदाळकर , जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य महावरकर व माजी प्राचार्य सुर्यकांत गुरुजी येरोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत, तर जगण्याची कला शिकवतात. विद्यार्थ्यांवर संस्कार, संस्कृती, आदर असे पैलू पाडण्याचे काम गुरुजन करतात. मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन, एखादी कलाकृती साकारतो, त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून जबाबदार नागरिक घडवतात.आई-वडिलानंतर शिक्षकच आपले पालकच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे, असे चिलकुरे यांनी सांगितले.
शिक्षक दिनी येथील शालेय व्यवस्थापन समीतीचे माजी अध्यक्ष हाबीब नवाबखा पठाण व बस्वराज चौसष्टे यांच्या वतीने शिक्षक दिनी विद्यार्थ्यानी निवडलेल्या बिरादार एम.एस व बिरादार टी.डी या दोन आदर्श शिक्षकांचा कृषी सभापती गोविंद चिलकुरे यांच्या हस्ते शालश्रिफळ , पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला . या वेळी जि.प, प्रशालेतील व जिजामाता विद्यालयातील शिक्षकांचाही ग्रामस्थाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मैन्नोदिन मुजेवार , हाबीब पठाण व नामदेव सिंदाळकर यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमास रवि पाटील , ओमप्रकाश तांबोळकर , माणिक बनसोडे , शिवानंद भुसारे , विनोद लोंढे , बाबुराव वाघमारे , शाळेतील शिक्षक विद्यार्थी व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. प्रास्तावीक शिवाजी बिरादार यांनी तर सुञ संचलन सुगावे सरांनी केले . उपस्थितांचे आभार मु.अ, प्रकाश नागटिळक यांनी मानले .
Comments
Post a Comment