निलंगा नगर पालिकेकडून बाबासाहेबांचा अवमान:पुतळा बदलण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.
निलंगा नगर पालिकेकडून बाबासाहेबांचा अवमान पुतळा बदलण्याच्या मागणीसाठी वंचितची पालिकेवर धडक
येथील नगर पालिका प्रशासनाकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे, कोणत्याही महापुरुषांचे स्मारक, पुतळा हे भावी पिढीसाठी प्रेरणास्थान, दिशादर्शी असतात त्यामुळे त्याची निर्मिती करताना काही बाबीची काळजी घेणे हे संबंधित विभागाचे कर्तव्य असते मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून मूठभर लोकांना हाताशी धरून पालिकेने बाबासाहेबांचा अवमान केला आहे.
तो पुतळा तात्काळ बदलुन नवीन पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने निलंगा पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
नगर परिषदेच्या वतीने शहरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.11 सप्टेंबर 2019 रोजी म्हणजेच एक वर्षांपूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्याचे प्रशासनाच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
पुतळा बसवून एक वर्ष पूर्ण होतो न होतो. तोच त्याच बाबासाहेबांच्या पुतळ्याचे टवके निघाले आहेत रंग निघून गेला आहे पुतळा खराब झाला आहे. त्यामुळे सदरचा बाबासाहेबांचा पुतळा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला आहे. बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे समस्त भारतीयांची अस्मिता आहे. सदरचा पुतळा हा अतिशय अतिउच्य दर्जाचा असायला हवा परंतु निलंगा नगर परिषेदेने अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा बसवून आंबेडकरी जनतेची फसवणूक तर केलीच आहे.परंतु विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.
त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या त्याच प्रमाणे भारतीय संविधानाचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेलेल्या आहेत.सदरची ही बाब आंबेडकरी अनुयायांच्या लक्षात आली आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व त्यांचा पुतळा म्हणजे भावी आंबेडकरी पिढीसाठी आदर्श व प्रेरणा आहे. सदरचा पुतळा निर्मिती (बांधणी) संदर्भात निलंगा येथील जागृत व प्रतिष्ठित आंबेडकरी मान्यवरांनी दि.३० डिसेंबर २०१७ रोजी पुतळ्यात दोष असल्या संदर्भात लेखी तक्रार देऊन आक्षेप नोंदविला होता.
परंतु त्यावेळी दिलेल्या निवेदनाबाबत निलंगा नगर परिषदेणे गांभीर्य घेतले नाही शिवाय निवेदन देणाऱ्यांच्या भावनेचा विचार करण्यात आला नाही. सदरचा प्रकार हा निलंगा न.प. ने जाणीवपूर्वक केला आहे. सदर निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की,दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तात्काळ सदरचा पुतळा बदलून नवीन दिल्ली येथील संसद भवनासमोर डॉ. बाबासाहेबांचा पुतळा ज्या प्रमाणे उभा करण्यात आल आहे.
त्याचप्रमाने नवीन पुतळा बसवण्यात यावा.
अन्यथा वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्ह्या संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल.होणाऱ्या परीणामास सर्वस्वी निलंगा नगर परिषद जवाबदार राहील याचीही नोंद घेण्यात यावी.असेही निवेदनात नमूद करण्यात आहे आहे.निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह तालुक्यातील असंख्य वंचित कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment