श्री महादेव विद्यालयाचे ग्रंथपाल पाटील एम ए व वरिष्ठ लिपिक देविदास उळागड्डे सेवानिवृत्त.

श्री महादेव विद्यालयाचे ग्रंथपाल पाटील एम .एम. व वरिष्ट लिपिक देविदास उळागड्डे सेवानिवृत्त.
 
प्रशांत तांबोळकर

देवणी : तालुक्यातील श्री. महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाळ येथील ग्रंथपाल पाटील एम.एम.व वरिष्ट लिपीक देविदास उळागड्डे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
  या कार्यक्रमाच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे-प्राचार्य रामलिंग मुळे हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पंचायत समितीचे सभापती- सौ चित्रकलाताई बिरादार, जिल्हा परिषद सदस्य- प्रशांत पाटील जवळगेकर ,पर्यवेक्षक- खोंडे यु.एन. प्रा. कांबळे आर.व्ही. हे उपस्थित होते.
श्री. महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ग्रथपाल पाटील एम .एम .व वरिष्ट लिपीक देविदास उळागड्डे यांचा सेवानिवृत्ती निमित्त यथोचित सपत्नीक सत्कार करून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. पंचायत समितीचे सभापती- सौ चित्रकलाताई बिरादार व जिल्हा परिषद सदस्य- प्रशांत पाटील जवळगेकर यांनी पाटील एम. एम .व देवीदास उळागड्डे यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पहार ,ग्रंथ भेट देऊन सपत्नीक सत्कार केला. कोरोना संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून प्रयोगशाळा विभागात निरोप समारंभाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.
ग्रंथपाल पाटील एम. एम. व वरिष्ट लिपीक देवीदास उळागड्डे यांनी आपल्या कार्याची सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली आहे. आणि यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून या दोघांची या विद्यालयात ओळख होती.
 सेवानिवृत निरोपसमारंभ कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी , प्राद्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दशरथ पाटील, सौ. रेखाताई मधुकर पाटील, सौ. सुवर्णा ताई देविदास उळागड्डे , सिद्धेश्वर पाटील,  मुकेश पाटील , बिरादार बी.पी., रोळे आबाजी, खंडागळे पद्माकर, त्यांच्यासह पाटील व उळागड्डे यांच्या परिवारातील कुटुंबीय, पञकार आणि मित्रपरिवार या कौटुंबिक सन्मानपूर्वक निरोप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते आणि सर्वांनी पुढील दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुञसंंचलन-शेटे आर.व्ही.यांनी केले तर आभार- केसाळे बी.एस यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..