शिक्षक दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार
शिक्षक दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : तालुक्यातील येरोळ येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शिक्षक दिनानिमित्त गुरुगौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात जेष्ट पत्रकार ओमप्रकाश तांबोळकर , रवि पाटील, व शिवानंद भुसारे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.अ. प्रकाश नागटिळक हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणुन लातुर जि.प.चे कृषी सभापती गोविंद चिलकुरे , सरपंच अतुल पाटील गंभीरे , मगेंश पाटील , मा. प्राचार्य सुर्यकांत गुरुजी येरोळकर हे होते . यावेळी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या बिरादार एम.एस व बिरादार टि.डी . यांच्या हस्ते विविध वृत्तपत्रांतील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार हे समाजाचे शिक्षकच असतात ; कारण माध्यमे जशी आपणास माहिती देतात, त्या प्रमाणे आपण घडतो. आपण आपली प्रतिक्रिया त्यानुसार व्यक्त करतो. त्यामुळे पत्रकार देखील आपले खऱ्या अर्थाने शिक्षक असतात, असे मत जि.प.चे कृषी सभापती गोविंद चिलकुरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी बिरादार यांनी केले. तर सुञ संचलन सुगावे सर यांनी केले .उपस्थितांचे आभार मु.अ. प्रकाश नागटिळक यांनी मानले .
Comments
Post a Comment