बेशिस्त वाहन चालकाकडून वीस हजाराचा दंड वसूल
बेशिस्त वाहन चालकांकडुन वीस हजार रुपयाचा दंड वसुल...
चाळीस वाहानावर कारवाई
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ - शिरूरअनंतपाळ शहराचा सर्वांगीण विकास होत असताना गेली अनेक वर्षापासून बस्वेश्वर चौकात होत असलेली सार्वजनिक वाहतूक कोंडी समस्या कायम होती. मात्र पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यानी सकारात्मक भूमिका घेऊन वाहतुक आराखडा तयार केला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहरातील बस्वेश्वर चौकात बेशिस्त वाहान थांबवुण अडथळा करणार्या चाळीस वाहानावर दंडात्मक कारवाई करण्यात येवुन वीस हजार रुपये दंड वसुल करन्यात आला.
शिरूरअनंतपाळ शहरातील बस्वेश्वर चौकात बेशिस्त पार्किंग करणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहिम शहरात सध्या जोरात चालू आहे. जे वाहन चालक वाहनचालवताना नियम मोडतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर खटले दाखल करण्यात येत आहे.
अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी आढळून आल्यास थेट पालकांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. शहरातील अनेक मुलं धूम स्टाइलने वाहने चालवत आहेत. याचा जेष्ट नागरिकांना व प्रवाशांना त्रास होत आहे . तसेच पालक बिनदिक्कतपणे अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देत आहे. अशा वाहन चालकांवर निर्बंध बसवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पुढाकार घेत अल्पवयीन मुलं, मुली वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बस्वेश्वर चौकातील वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्त वाहानाची पार्किंग करुन वाहातुकीची कोंडी होत होती . शहराच्या लोकसंख्येत अधिक वाढ होत आहे.तर चौकात सार्वजानीक रस्त्यावर अतीक्रमण वाढले आहे . शिवाय पूर्वीपेक्षा चार पटीने फिरती लोकसंख्या वाढली असल्याचे नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे. बेशिस्त वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे छोटे –मोठे अपघात घडत आहेत.
शहरांतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन नियमांची पायमल्ली करणाऱ्यावर कठोर कारवाई करत आहे. वाहनतळ नागरिकांना खुले झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक शिरूरअनंतपाळ पोलीस ठाणे
Comments
Post a Comment