खाकी वर्दीतही माणुसकी असते,परंतु गुन्हेगारांवर धाकही हवाचं - पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम
खाकी वर्दीतही माणुसकी असते , परंतु गुन्हेगारावर धाकही हवाच :
- पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : पोलिस म्हंटले की, खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दात बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असते. त्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस म्हंटले की, इतका धाकही हवाच. पोलिसांना कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते. असे असले, तरी या वर्दीतही तो मनुष्य असतो, त्यालाही मन, भावना असतात. ड्युटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो.असे प्रतिपिदन पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी केले.
कोरोनाच्या महामारीत पोलीसाच्या बदल्या होतील की नाही अशी चर्चा होत असतानाच सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोलीस अधिक्षक डाॅ.राजेंद्र माने यांनी जिल्ह्यातील पोलीसाच्या बदल्या केल्या . यामध्ये एकाच पोलीस ठाण्यात पुर्ण कार्यकाल झालेल्या व काही जनांच्या विनंतीवरुन तर काहीच्या प्रशासकीय कारणावरुन बदल्या झाल्या .त्यामध्ये शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार व नाईक पदावरील कर्मचार्याच्या बदल्या झाल्याने त्यांना पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी भावपुर्ण निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम व पोलीस उपनिरिक्षक मल्लया स्वामी यांनी बदली झालेल्या पोलीस हवालदार लक्ष्मण पाटील ,जैनुद्दिन शेख ,हरीराम सोनकांबळे , व पोलीस नाईक विनोद गोमारे ,लतीफ सौदागर , पोलीस शिपाई सुर्यकांत कोळेकर , महिला पोलीस शिपाई लजीना शेख यांची बदली झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व शुभेच्छा देवुन निरोप देण्यात आला .
Comments
Post a Comment