पावसाच्या पुन्हा आगमनाने खरीप पिकांना नवसंजीवनी
पावसाच्या पुनरागमनाने खरीप पिकांना नवसंजीवनी
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्यामुळे खरीप पिकांना फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावामध्ये पाऊस पडत आहे.
महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पिक कोमेजू लागली होती. मात्र,वेळेवर पाऊस आल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.खरीप हंगामातील हमखास पैशे मिळवुन देणार्या सोयाबीन या पिकांना पावसामुळे लाभ झाला असून, बागायती क्षेत्रातील उसाच्या वाढीसाठीही हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.
या पावसामुळे रब्बी पिकांच्या पूर्व मशागतीस गती येईल, अशी माहिती येरोळ येथील प्रगतशिल युवा शेतकरी गुंडेराव चोसष्टे यांनी बोलताना माहीती दिली.ऐन शेंगात दाने भरण्याच्या अवस्थेत असतांना पावसाने गेल्या महिणाभरापासुन दडी मारली होती . त्यामुळे सोयाबीनचे पिक कोमेजुन जात होते.परंतु गेल्या दोन दिवसापासुन पाऊस पडत असल्याने शेतकर्यांतुन आनंद व्यक्त केला जात आहे .
Comments
Post a Comment