निलंग्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा निकृष्ट पुतळा बदलण्याची मागणी
निलंग्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा निकृष्ट पुतळा बदलण्याची मागणी
लातुर,दि१०(मिलिंद कांबळे)
निलंगा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभा करण्यात आलेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बदलण्याची मागणी काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके व येथील जागृत भीमसैनिकांच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषेद निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरात पूर्णाकृती पुतळा उभा रहावा अशी अनेक वर्षा पासूनची आंबेडकरी अनुयायांची मागणी होती.
मागणी प्रत्यक्षात उतरवण्या साठी अनेक आंदोलने,उपोषणे,मोर्चेही निघाले होते.मागणी शासन दरबारी मान्य होऊन दि११सप्टेंबर२०१९ रोजी निलंगा नगर परिषेदेच्या समोर डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
पुतळा लोकार्पण करून वर्ष पूर्ण होतो न होतो तोच पुतळ्यावरील रंग गेला, पुतळ्या वरील भागाचे टवके निघालेले आहेत.पुतळा बनवण्यासाठी दर्जेदार वस्तूचा वापर करण्यात आला नाही काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून देशात अनेक भ्रष्टाचार झाले आहेत परंतु पुतळा उभारणी कामात भ्रष्टाचार हा देशातील पहिलाच भ्रष्टाचार आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पुतळ्या समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेटची प्रतिकृती ही अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहे त्याचप्रमाणे चबुतरा व बाग हे देखील निकृष्ठ दर्जाचे आहे.
सदरील कामाबाबत निलंगा नगरपालिकेने तात्काळ पुतळ्याच्या दर्जाची तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करावी पुतळ्या बाबत डिसेंबर २०१७ ला आंबेडकरी अनुयायांनी हस्तक्षेप घेतला होता.तसी तक्रारही करण्यात आली होती.मात्र त्याची दखल घेण्यात
आली नाही.
त्या निवेदनाची आता तात्काळ दखल घेऊन पुतळा तात्काळ बदलण्यात यावा व दिल्ली येथील संसद भवनासमोर जसा पुतळा उभा करण्यात आला आहे.तसा पुतळा उभा करण्यात यावा असी मागणी आता जोर धरत आहे.
त्याचप्रमाणे विद्यापीठ गेट प्रतिकृती तात्काळ दुरुस्त करावी निकृष्ट दर्जाचे काम करून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या व भ्रष्टाचारास कारणीभूत असणाऱ्या प्रशासन व सत्ताधारी आमदार यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर काँग्रेसचे नेते अभय साळुंके,शरद पवार विचार मंचचे सुधीरदादा मसलगे, माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे,सुधाकर पाटील,गिरीश पात्रे,रोहन सुरवसे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव नाना सूर्यवंशी,सुरेंद्र महाराज कांबळे, लहुजी सेनेचे गोविंद सूर्यवंशी, वंचितचे भगवानदादा कांबळे, प्रदीप सोनकांबळे, माधवराव पाटील,लक्ष्मण बिराजदार,शकील पांढरे, सिद्धेश्वर बिराजदार,चेतन गायकवाड,प्रमोद सुरवसे,विनोद भोसले,नागेश सुरवसे,संदीप मोरे,अंगद जाधव,साहेबराव कांबळे, गणेश पेठकर,दिनकर कांबळे, सुग्रीव सूर्यवंशी, शिवाजी घोलप इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
लातुर/ मिलिंद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment