कासारसिरसी येथे वृद्धदिन साजरा
कासारसिरसी येथे जागतिक वृद्ध दिवस साजरा
कासारसिरसी,दि०१(श्याम मुळजकर)
मौजे कासारसिरसी येथील एकता बहुउद्देशीय महिला मंडळ संचालित आधार या वृद्धाश्रमात 1ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनाचे औचित्य साधून वृद्ध दिन अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
यानिमित्त वृद्धाश्रमात वृक्षारोपण वृद्धांची आरोग्य तपासणी भजन कीर्तन मिष्ठान्न भोजन व फळे वाटून वृद्ध दिन साजरा करण्यात आला. या समारंभास ज्येष्ठ पत्रकार श्याम मुळजकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सामाजिक न्याय व अधिकारी ता मंत्रालय नवी दिल्ली पुरस्कृत भारत सरकारच्या वतीने कासारसिरसी येथे गेल्या 5 वर्षापासून सर्व सोयीने युक्त मोफत निवासी आधार वृद्धाश्रम चालवले जात असून पन्नास वृद्धांची सुसज्ज सोय असलेल्या या वृद्धाश्रमात सध्या 25 पेक्षा अधिक वृद्ध आश्रयास असून त्यांची सेवा मातृत्वाच्या भूमिकेतून करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष संचालिका सौ मनीषा होळकुंदे यांनी दिली.
या धावपळीच्या युगात कुटुंबातील वृद्धांना खऱ्या अर्थाने गरज आहे या एकमेव विचाराने प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी श्रावण बाळाच्या भूमिकेत वृद्धांना सेवा देण्याचे व्रत स्वीकारले आहे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले याप्रसंगी प्रमुख पाहुणे महेश गरंडे महाराष्ट्र युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत केंगारे यांचा सत्कार करण्यात आला समारंभाचे आयोजन आश्रमातील अधीक्षक डी एन मरडे यांनी केली आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पत्रकार मूळजकर म्हणाले की प्रत्येक घरात एक म्हातारा आहे पण तो त्या घरातला म्हातारा नसून महातारा आहे. याचा विसर आजच्या तरुण पिढीला पडला आहे हे खरे दुर्दैव आहे.असे सांगून ते म्हणाले की समाजातल्या उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम ही काळाची गरज असल्याचे सांगून एकता बहुउद्देशीय महिला मंडळा च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाबाबत सौ मनीषा होळकुंदे यांच्या कार्याचे त्यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment