राम टोंपे यांचे दुःखद निधन
हलगरा , दि ११ (प्रेमसागर गवळे)
मौजे हलगरा ता.निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेले राम दत्तु टोंपे यांचे देि.१० ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी निधन झाले.
मृत्यू समयी ते ३४ वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावर दि.११ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी अंतिमसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात,आई,वडील,पत्नी,भाऊ, तीन मुले, असा परिवार आहे. गेली १० वर्षांपासून ते पुणे येथे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होते.अतिशय कष्टाळू, सुस्वभावी असा त्यांचा स्वभाव होता.प्रत्येकांच्या सुख दुःखात ते नेहमी सक्रिय असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या शिकवणी नुसार ते जीवन मार्गक्रमण करीत असत. त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे
Comments
Post a Comment