बेडर,बेरड,रामोशी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी...

बेडर रामोशी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची  मागणी

लातूर,दि१२(बालाजी मिलगिरे)
 
बेडर,बेरड,रामोशी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे व शासन दरबारी अन्य प्रलंबित असलेल्या मागण्या तात्काळ  मान्य करण्यात याव्यात अश्या विविध मागण्या येथील समाज बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व स्थानिक आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

निवेदनावर जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य बालाजी मिलगीरे, सायबा कानडे, रवी यंपाळे, व्यंकटेश मंडले, उमेश बुकले, रामलिंग भोगीले यांच्यासह  अन्य समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
 
दिलेल्या  निवेदनात पुढे असे नमूद केले आहे की, महाराष्ट्रात बेडर,बेरड,रामोशी समाज गेले अनेक वर्ष पासून आर्थिक, शैक्षणिक दृष्टया  मागास  असून शासनाच्या योजनांपासून वंचित आहे.या समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदने देण्यात आली.

 या प्रमुख मागणीसह रामोशी समाजाच्या वतीने  वतनी जमिनी परत मिळाव्यात, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावरील चित्रपटासाठी मागील सरकारने दहा कोटीचा निधी मंजूर केले होते.तो निधी या शासनाने उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे मागील सरकारने समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विकास महामंडळ स्थापन करून शंभर कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता.तो निधी अमलांत आणावा,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक व बहिर्जी नाईक यांच्या कार्याचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये संपूर्ण समाविष्ट करावा शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर आसलेल्या विजापूर राज्य महामार्गाला देण्यात यावे.
या  विविध मागण्याची शासनाने दि(31) ऑक्टोबर २०२०  पर्यंत दखल घेतली नाही तर दि. २ नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आमदार निवास स्थान खासदार मंत्र्याचे निवासस्थाना समोर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा  निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..