ऑड.प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपाहार्य पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी...
ऑड.प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपाहार्य पोस्ट करणाऱ्यां विरोधात कारवाई करण्याची मागणी
कारवाई न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा ‘युवा भिम सेना
मुरुड (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील काही जातीयवादी समाजकंटकांनी मागील चार-पाच दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍड प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपाहार्य पोस्ट करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशा समाजकंटकावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचया मागणी संदर्भात युवा भीम सेनेच्यावतिने जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्राम, ईमेल, टेलिग्राम, आदींच्या साह्याने बदनामीकारक पोस्ट करून ट्रोल केले जात आहे, तसेच अशा कृत्यामुळे समाजा-समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यामुळे शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे वेळीच अशा पोस्ट करणाऱ्या समाज कंटकावर वेळीच जिल्हा प्रश्नाने पाऊले उचलून सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दखल करावेत जेणे करून असे कृत्य ते पुन्हा करणार नाहीत, दिलेल्या निवेदनावर प्रकाश जबडे जिल्हाध्यक्ष, विदेश सोमवंशी, शहर अध्यक्ष लातूर, पंकज गायकवाड संपर्क प्रमुख, सिद्धार्थ गवळी, शेखर कांबळे, राजेंद्र टिळक, मेहबूब सय्यद, अमोल जोगदंड, अमोल जागते, महबूब शेख, अभी टिळक, अतुल अडसुळे, सोनू गायकवाड, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments
Post a Comment