भारतीय बौद्ध महासभेची निलंगा कार्यकारिणी जाहीर
भारतीय बौद्ध महासभा निलंगा शहर कार्यकारिणी जाहीर
निलंगा,दि१८(प्रवीण कांबळे)
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्नांने बौध्द धम्माचा गाढा अभ्यास करून१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रसार,प्रचार करण्यासाठी बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली.
भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा महाऊपासिका मिराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर कार्यरत असलेले भिमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा निलंगा शहर कार्यकारीणी आज दि.(१८)रोजी जाहीर करण्यात आली.
येथील आंबेडकर बौद्ध विहारात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रा.रोहित बनसोडे होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष (संस्कार विभाग)आर.वाय कांबळे, डॉ.बी आर गायकवाड ऍड दिलीप सातपुते ,संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी शांतिदुत तथागत गौतम बुद्ध ,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिपाने,धुपाने,पुष्पाने पूजन करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
यावेळी या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते शहर अध्यक्षपदी ऍड.सुलक्षण धैर्य. यांची निवड करण्यात आली.तर आयु. ऍड.धनराज धैर्य (सरचिटणीस)आयु.दयानंद टाकळीकर(कोषाध्यक्ष)आयु.इंद्रजीत कांबळे(संस्कार उपाध्यक्ष) आयु.उत्कर्ष कांबळे( संस्कार सचिव)आयु.मिलिंद कांबळे(पर्यटन प्रचार)आयु. बब्रुवान गायकवाड(पर्यटन सचिव)
आयु.विजयकुमार सूर्यवंशी (संरक्षण उपाध्यक्ष)
आयु. एस.के कांबळे(संरक्षण सचिव)
आयु.साबळे ए.आर (तालुका संघटक) विलास कांबळे (तालुका सरक्षण) या सर्वांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.
Comments
Post a Comment