आर्सोनिक अल्बम गोळ्यांचे वाटप
आर्सोनिक अल्बम गोळ्यांचे वाटप
निलंगा:दि १८(प्रवीण कांबळे)
निलंगा तालुक्यातील मदनसुरी गावचे भूमिपुत्र समाजसेवक डॉ आत्माराम बाबुराव माने पाटील यांच्या आरोग्यम क्लिनिक कात्रज , पुणे या दवाखान्याला ३ वर्ष पूर्ण झाल्या निमित्य त्यांच्या दवाखान्याच्या वतीने 'आर्सोनिक अल्बम 30' गोळ्यांचे मोफत वाटप निलंगा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना दि 18/10/2020 वार रविवार दुपारी 12 वाजता शासकीय विश्राम गृह निलंगा येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनसुरीचे समाजसेवक विजय माने पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलंगा तालुका पत्रकार संघाचे सचिव झटिंग आण्णा म्हेत्रे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गुरुनाथ मोहोळकर, आपल्या समाजसेवेबद्दल मनोगत युवा समाजसेवक विजय माने पाटील, तर आभार प्राध्यापक पत्रकार अभिमन्यू पाखरसांगावे सर यांनी मांनले. यावेळी मदनसुरीचे युवा समाजसेवक गणेश माने, पत्रकार संघाचे श्रीशैल बिराजदार, मोहन क्षीरसागर, नाना रामदासी, राजेंद्र पवार, मिलिंद कांबळे, रविकिरण सूर्यवंशी, द्रोणाचार्य कोळी, अस्लम झारेकर, रमेश शिंदे, गोविंद सुरवसे इत्यादी पत्रकार उपस्थित होते. यानंतर मरीआई वस्ती, ईनामवाडी येथे आर्सोनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वस्तीतील सायम्मा कोटलवार, रामक्का शिंदे, श्यामराव कोटलवार, रामभाऊ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर वडार वस्ती ईनामवाडी येथे गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वस्तीतील गणेश बिरापुरे, अंकुश दंडगुले, शंकर जाधव, हणमंत चव्हाण, धनराज बीजापुरे, शंकर दंडगुले इतर समाजबांधव उपस्थित होते. युवा समाजसेवक विजय माने पाटील, गणेश माने यांच्या हस्ते गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार रविकिरण सूर्यवंशी, पत्रकार गुरुनाथ मोहोळकर उपस्थित होते. तसेच आतापर्यंत समाजसेवक डॉ आत्माराम बाबुराव माने पाटील , विजय माने पाटील, यांनी समाजसेवेच्या भावनेतून निलंगा तालुक्यातील मदनसुरी, मोगरगा गावामध्ये, निलंगा कोर्टातील वकिलांना, किल्लारी पोलीस स्टेशन, कासार शिर्शी पोलीस स्टेशन येथे आर्सोनिक अल्बम 30 गोळ्यांचे मोफत वाटप केले आहे.
Comments
Post a Comment