अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी...

कोरडवाहूला 25 तर बागायातला 50 हजाराची मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची  मागणी 


निलंगा,दि२३(प्रवीण कांबळे)

गेल्या १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी चिंताग्रत झालेला आहे.अनेक शेतकऱ्यांनी मशागतीस हजारो रुपये खर्च करून पेरणी केलेली आहे.परंतु अतिवृष्टीमूळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे भरून न येणारे आहे .अतिवृष्टी भागात अनेक मंत्र्यांचे पाहणी दौरेही झालेले आहेत.याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने नुकतीच  शेतकऱ्यांना मदत  जाहीर केलेली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 10हजार तर बागायत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये दोन हेक्टरी पर्यत मदत जाहीर केली आहे. ती मदत तोकडी आहे, शेतकऱ्याच्या पिकाचे न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. 
याबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा मा.. बाळासाहेबांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हापथकाने शुक्रवार दि.23 ऑक्टोबर रोजी दिवसभर लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्याच्या भावना ऐकून घेतल्या खरेच शेतकऱ्याच्या पिकाचे न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. सरकार शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान भरपाई तर करून देत नाही, किमान शेतकऱ्यांना जगण्याचा आधार म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 25 तर बागायत शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने निलंगा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत सरकार कडे केली आहे. जर सरकारने मागणी पूर्ण नाही केली, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला .या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय प्रशिक्षक प्रा डॉ. सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष प्रा.सदाशिव भिंगे, जिल्हा प्रवक्ता डॉ.संजय कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल लांडगे, मझर पटेल, दिलीप कांबळे,महेंद्र बनसोडे,वैभव कांबळे,प्रा.अतुल वावरे, जावेद मुजावर, विजयकुमार सूर्यवंशी,भारतबाई कदम,बालाजी कांबळे,प्रवीण कदम यांच्यासह अनेक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..