जनतेतून सरपंच निवडीचा कोठेही निर्णय नाही. - - - बाबासाहेब पावसे-पाटील
जनतेतून सरपंच निवडीचा कोठेही निर्णय नाही... बाबासाहेब पावसे पाटील
अहमदनगर प्रतिनिधी :
आज काल पासून तरुण भारत पत्रामध्ये सरपंच जनतेचाच छापलेली बातमी महाराष्ट्र मधे अर्धवट व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेकांचा गैरसमज निर्माण झाला. लोकांना असे वाटले की, सरपंचांची निवड जनतेतूनच होणार तर, ते तसे नाही निवडून आलेल्या जनतेतील सरपंचांवर अविश्वास ठराव संदर्भामध्ये राज्य शासनाने बदल केले होते. जनतेतील सरपंचांवर अविश्वास ठराव घेताना ग्रामसभा वगळली होती तसे राज्य शासनाचे १६ सप्टेंबर चे परिपत्रक होते. परिपत्रकानुसार ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचांवर अविश्वास ठराव येणार होता असे अनेक अविश्वास ठरावांची मालिका राज्यांमध्ये चालू झाली होती. राज्य सरकारचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना कोल्हापूर आजरा येथील झालेल्या पत्रकार परिषदेत सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने ही बाब निदर्शनास आणून दिली होती. राज्य सरकारने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आगामी राज्यात होणाऱ्या १४०००ग्रामपंचायतींच्या निवडणुका जनतेतून किंवा सदस्यांनमधून असे स्पष्ट आदेश अजुन आलेले नाहीत. पण या सरकारने जनतेतून निवडण्याचा कायदा रद्द केलेला आहे. अशी माहिती पुढे आली आहे, असा कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती सरपंच सेवा संघाच्या वतीने एका पत्रकाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment