वंचितचे नेते भरत गायकवाड यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा...
निलंगा,दि१२(प्रविण कांबळे)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेले त्यांच्याच विचारावर मार्गक्रमण करणारे
ऑड.बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक,वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार तथा बौद्ध समाजातील यशस्वी उद्योजक आयुष्यमान भरत गायकवाड(साहेब) यांचा वाढदिवस आज अत्यंत उत्स्फूर्तपणे अत्यंत उत्साहात,अत्यंत आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ओ.बी. सी.नेते मोहन क्षिरसागर, ऑल इंडिया धनगर समाजाचे नेते झटिंग (अण्णा) म्हेत्रे, पत्रकार मिलिंद कांबळे उपस्थित होते.
तत्पूर्वी सामुदायिक त्रिशरण,पंचशील घेण्यात आले.यावेळी भारीपचे तालुका महासचिव देवदत्त सूर्यवंशी,माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी, भारतबाई कदम यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी भरत गायकवाड (साहेब)यांच्या जीवनावर अनेकांनी प्रकाश टाकला.
यावेळी संजय कांबळे,आनंद भुते,सोमा कांबळे,महादेव कांबळे,श्याम कोल्हे,अमोल कांबळे,राजेंद्र कांबळे, भिकाजी गायकवाड,उस्तुरी येथील धनगर समाजाचे नेते शिवदत्त गुंजोटे,बालाजी कांबळे हंद्राळकर चिंचोली(स)येथील विजय उस्तुरे,
दीपक कांबळे, वाघंबर गायकवाड, हरी गायकवाड, प्रफुल शिंदे यांच्यासह अनेक बौद्ध उपासकासह वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment