अंबुलगा(वि)येथील महिला सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

अंबुलगा (वि) येथील महिला सरपंचावर अविश्‍वास ठराव दाखल

मौजे अंबुलगा(वि)येथील ग्रामपंचायतिच्या महिला सरपंच सौ.गिता पंडित पौळ  यांच्या विरोधात ग्राम  पंचायतच्या ५ सदस्यांनी दि०५ सप्टेंबर रोजी निलंगा  तहसीलदाराकडे अविश्‍वासाचा ठराव दाखल केला आहे .

अंबुलगा (वि)ग्रामपंचायत सदस्य संख्या एकुण ९ असून त्यापैकी ५ सदस्यांनी महिला सरपंच  सौ.गिता पौळ या ग्रामपंचायतीचे काम पाहत असताना सदस्य व उपसरपंच यांना विश्‍वासात घेत नाहीत, सरपंच यांचे पती  शासकीय कर्मचारी असूनही ग्रामपंचायतीचा कारभारात हस्तक्षेप करतात व अरेरावेची भाषा वापरतात,त्यांना गावाचे हित नाही, मिटींगमध्ये हिशोब सांगत नाही, स्वच्छता अभियान राबवित नसून
सर्व गावांमध्ये पाणीपुरवठ्याची पाईपलाईन  असून रमाई नगर मध्ये कसल्याच प्रकारची पाण्याची सुविधा नाही.शासनाने आखून दिलेल्या आराखड्यामध्ये१४ व्या वित्त आयोग टक्केवारीनुसार दलितवस्तीमध्ये खर्च करण्यासाठी  ग्रामपंचायतच्या खात्यावर रक्कम शिल्लक  असतानादेखील सरपंचानी  जाणीवपूर्वक  दलित वस्तीचा विकास रोखला आहे. आंबेडकर नगर मध्ये पावसाच्या पाण्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी जात आहे. 

गावात व दलित वस्तीत दिवाबत्तीची सोय नाही,साठे नगर मध्ये नाली नाही, रस्ता नाही   जाणीवपूर्वक ग्रामसेवक व सरपंच सौ गीता पंडित पौळ या निलंग्यात बसून कारभार पाहतात ग्रामसेवक अनिल आवले गावांमध्ये येत नाहीत.ग्रामसेवक यांना दलित वस्तीच्या कामाबद्दल विचारल्यास  उपसरपंच यांना अरेरावीची भाषा करतात. स्वच्छ भारत मिशन मध्ये दलित वस्ती मधील बारा लोकांचे सौचालयाचे बिले सरपंचांनी परस्पर उचलले आहेत.सरपंचाच्या या हुकुमशाही विरोधात व शासनाच्या आणखीन पैशाची लूट होऊ नये म्हणून उपसरपंच व सदस्य यांनी
कर्तव्यात कसूर करित असल्याचा ठपका ठेवून निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे अविश्‍वास ठरावाची नोटीस दाखल केली आहे.

 ठरावावर उपसरपंच सतीश भानुदास आडे,उषा बसवराज डीगे,सदस्य,ललिता राजेंद्र शिंदे सदस्य,छबुबाई सुभाष पौळ सदस्य,सतीश केरनाथ मुगळे यांनी तहसीलदारा समक्ष स्वाक्षर्‍या केल्या व तहसीलदार  यांना निवेदन दिले . दरम्यान तहसीलदार यांनी ठराव पडताळणीसाठी दि १२सप्टेंबर२०२० वार सोमवारी  रोजी  अंबुलगा (वि) ग्रामपंचायती मध्ये सरपंचा विरोधातील अविश्वास ठराव या विषयावर आमसभा घेणार  आहेत. या सभेत काय निर्णय होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले  आहे. आता पुढील सरपंच कोण होणार आहे याची चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे ९सदस्यां पैकी ३ सदस्य यापूर्वीच अपात्र ठरले आहेत हे विशेष आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..