निलंग्यात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निकृष्ट पुतळ्याबाबत आंदोलन...
निलंग्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निकृष्ट पुतळ्याबाबत आंदोलन
निलंगा /मोहन क्षिरसागर
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून जगात ज्या देशाची ख्याती आहे.तो देश म्हणजे भारत देश होय.या देशाची मान अभिमानाने उंचावण्यासाठी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अमूल्य योगदान आहे.
अश्या या महामानवाचा निलंग्यात पूर्णाकृती पुतळा बसवण्याची येथील अनेक वर्षांपासून आंबेडकरी बांधवांची मागणी होती.याबाबत अनेकवेळा अनेक पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध आंदोलनात सहभाग घेऊन पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी आंदोलन केले होते.
या होत असलेल्या मागणिबाबत माजी पालकमंत्री तथा विद्यमान निलंगयाचे आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळा व परिसराच्या विकासाठी मंजुरी घेतली व भरघोस निधी उपलब्ध करून दिला.पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करून निलंगा नगरपरिषद मार्फत एक वर्षभरापूर्वी तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर, जिल्हाधिकारी जी श्रीकांत व जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. पुतळा लोकार्पण दिवशीच उपस्थित जनतेत पुतळ्याबाबत पुतळा निकृष्ट व अवमानकारक असल्याची चर्चा होती.
लोकार्पण करून एक वर्ष पूर्ण होतो न होतो तोच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अहवेलना (विटंबना) व्हायला सुरुवात झाली.बाबासाहेबांच्या पुतळ्याचे टवके, निघू लागले, पापुंद्रे निघू लागले रंग निघून गेला.
याबाबत येथील जागृत नागरिक विविध पक्ष संघटनांनी तक्रारी अर्ज देऊन पुन्हा पुतळा बद्दलण्याची मागणी केली आहे.मागणी करून जवळपास दीड महिना उलटून गेला तरीही
निलंगा नगर परिषदेकडून काहीच हालचाली झाल्या नसल्याचे दिसून आले .अश्या या बेजबाबदार निलंगा नगर परिषदेच्या वर्तुनुकीच्या व कारभारा बाबत दि.०८ऑक्टोबर२०२०रोजी राष्ट्रवादी युवक(शहर) काँग्रेस पार्टी व शरद पवार विचारमंच निलंगा च्या वतीने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
त्याचप्रमाणे तालुक्यातील व शहरातील विविध विकास कामांमधील झालेल्या गैरकारभार विरुद्ध चौकशीच्या मागण्यांसाठी व केंद्र सरकारने मराठा आरक्षण वरील तात्काळ स्थगिती उठवून तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर मराठा आरक्षण लागू करणे तसेच निलंगा शहरातून लातूर बिदर रोड लगत अटल पथ रस्त्याचे निकृष्ट कामाची चौकशी समिती नेमून चौकशी करणेबाबत राष्ट्रवादी युवक(शहर) काँग्रेस व शरद पवार विचारमंच निलंगाच्या वतीने उपविभागीय कार्यालयामोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यामध्ये प्रमुख मागण्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निलंगा शहरातील पूर्णाकृती पुतळा सदोष व निकृष्ट दर्जाचा उभा केला आहे. त्याची चौकशी समिती नेमणूक करून संबंधित दोषीवर कारवाई करणे, निलंगा शहरातील लातूर बिदर रोड लगत अटल पथ रस्त्याचे काम निकृष्ट झाले त्याची चौकशी करणे, निलंग्यातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती व पाणीपुरवठा योजना सुरळीत करणे, मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठवावी व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर मराठा आरक्षण लागू करावे.
कोरोनाच्या कालावधीतही न थांबता अख्या जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची सरसकट पंचनामे करावे व पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी , निलंगा नगर परिषदेचे सतत गैरहजर राहणारे मुख्याधिकारी व नगर अभियंता कैलास वारद यांची तात्काळ बदली करण्यात यावी,हाडगा रोड वरील कचराकुंडीत कचरा टाकण्यात येत असलेल्या नवीन डंम्पिंग च्या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात करावी.
अशा अनेक मागण्यांसाठी निलंगा उपविभागीय
अधिकारी कार्यालयच्या समोर राष्ट्रवादीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये राष्ट्रवादी युवक (शहर)अध्यक्ष धम्मानंद काळे ,सुधीर मसलगे, अंगद जाधव ,जीवन तेलंग,गणीमामु खडके , गफार लालटेकडे ,पंढरी पाटील,लक्ष्मण क्षीरसागर, महादेवी पाटील ,रूक्मीनबाई कांबळे , सुरेश रोळे ,महेश मसलगे ,सुमित जाधव ,संदीप मोरे ,विकास ढेरे ,राजकुमार माने ,राम पाटील , शिवशंकर बनसोडे ,विश्वनाथ सोळुंके ,सुग्रीव सूर्यवंशी ,नानासाहेब पाटील ,संजय सोनकांबळे , सुलक्षणा जगताप ,सुगंधा जगताप ,बालाजी जोडले राधा जगताप यांच्या स्वाक्षर्या आहेत.
या आंदोलनास लातूर चे माजी नगरसेवक नवनाथ आलटे,धनगर नेते झटिंग म्हेत्रे,विर लहुजी सेनेचे गोविंद सूर्यवंशी, ऍड बी आर धैर्य, ऍड सुलक्षण धैर्य,ऍड धनराज धैर्य, ऍड अमोल धैर्य, यांच्यासह अनेकांनी या आंदोलनास पाठींबा दिला.
याप्रकरणी नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निकृष्ट पूर्णाकृती पुतळ्या बाबत व नगर परिषेदेच्या निकृष्ट कामाबाबत उच्य स्तरीय चौकशी नेमतील का ?असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे.
Comments
Post a Comment