वंचितचे प्रा.सदाशिव भिंगे यांना आदरांजली
वंचितचे प्रा.सदाशिव भिंगे सर यांना आदरांजली
निलंगा,दि०३(प्रवीण कांबळे)
वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.सदाशिव भिंगे यांचे व त्यांच्या इतर नातेवाईकांचे अपघातात निधन झाले आहे. वंचित बहुजन आघाडी निलंगा तालुक्याच्या वतीने आज दि.०४ डिसेंबर २०२० निलंगा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी प्रा.भिंगे सर यांच्याबद्दल तीव्र दुःखात आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रा. भिंगे सर हे आंबेडकर घराण्याचे कठ्ठर समर्थक होते. त्यांनी कमी दिवसात लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पक्षाचे काम वाढवले आहे.सदाशिव भिंगे यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडी मध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष युवराज जोगी,जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर, पत्रकार मिलिंद कांबळे, पत्रकार गोविंद सुरवसे,पत्रकार,बालाजी कांबळे, वंचितचे अंकुश कांबळे,देवदत्त सूर्यवंशी,विजयकुमार सूर्यवंशी,बालाजी कांबळे ,अंकुश गायकवाड,भरत गायकवाड, विजय उस्तुरे,साहेबराव कांबळे, दत्ता सूर्यवंशी(माळेगावकर)
यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment