चालकाचा ताबा तुटला-वाघोली पाटीजवळ बस ट्रकचा अपघात !
चालकाचा ताबा सुटला - वाघोली पाटीजवळ बस ट्रकचा अपघात !
रस्त्याच्या कडेला बस पलटी, एकाचा मृत्यू, १३ जण जखमी
लातुर, दि १०
लातूर - उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली पाटी (ता.औसा) येथे एसटी बस व ट्रकचा अपघातात एकाचा मृत, तर १३ प्रवाशी जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.दहा ) सकाळी घडली. यात एसटीचे ही मोठे नुकसान झाले आहे. निलंगा आगाराची बस (एमएच २० बीएल ३९७३) १४ प्रवासी घेऊन घेऊन निलंगा ते अकोला प्रवासासाठी निघाली होती. वाघोली पाटीजवळ ट्रक व बस समोरासमोर बाजुला घासली.
यामुळे बस चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी महसूल, पोलीस तसेच एसटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एसटी महामंडळाचे अजय गायकवाड, ए. डब्ल्यू. एस. होळकर, डी.वाय. एम. ई. जाधव, वाहतूक नियंत्रक एस.एस. परिहार हे घटनास्थळी उपस्थित होते. पुढील कार्यवाही साठी औसा पोलीस तपास करत आहेत.
Comments
Post a Comment