सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचितचे रक्तदान शिबिर


बाळापुर, दि. १६ - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी बाळापुर तालुका व शहर च्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोव्हिड १९ प्रादुर्भाव काळ असल्याने विविध रक्त पेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा वेळी सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवशी बाळापुर येथील जय स्तंभ परिसरात हे शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, पुरषोत्तम अहिर, विजय तायडे, विकास सदांशिव, किसन सोळंके, वैभव वानखडे अजय पातोडे उपस्थित होते. युवकांनी मोठ्या प्रमाणावर शिबिरामध्ये हिरिरीने भाग घेत रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका सोशल मीडिया प्रमुख भुषण पातोडे, गुलाबराव उमाळे(मेजर), संजय उमाळे, गणेश सुरजूसे, अफसर खान, मनोज गवई, रामराव सावळे, सुहास इंगळे, प्रकाश उमाळे, ऍड प्रशात उमाळे,
संघपाल अवचार, हिम्मत सिरसाट, रवींद्र गवई, अशोक तायडे,पवन सिरसाट,उमेश इंगळे, सागर उपर्वट, अतुल दांडगे, गुड्डू भारसाकळे, अश्विन अंभोरे, अनिकेत कवळकार,पप्पू सुर्वे, विक्की टेलगोटे, हर्षद इंगळे, दिनेश गाडेकर, मनीष तायडे, शुभम तिडके, रोशन इंगळे,
शारिक पटेल यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..