जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत पडून मृत्यू.

जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू

चार दिवसानंतर प्रेत काढले पाण्याबाहेर

लातुर,दि १७(मिलिंद कांबळे)

 जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेलेल्या शेतक-यांचा पाय घसरून नदीत पडल्याने पाण्यात बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,मौजे जवळगा(सा)ता देवणी जिल्हा लातुर येथील धोंडीराम दत्तात्र्य पाटील वय ५८वर्षे हा शेतकरी दि.१३ रोजी सांयकाळी सहा०६ वा  च्या सुमारास आपल्या जनावरांना मांजरा नदीवर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला होता.परंतु  अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने  त्या शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला.

शेतकऱ्याला पोहता येत नसल्याने त्यांचा बुडुन मृत्यू झाला.मयत शेतकऱ्यावर नदी काठावरच वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले आहे. 
            याबाबत देवणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्याच्या पार्थिवावर गावातील सार्वजनिक स्मशानभूमित अंतीमसंस्कार करण्यात आले. मयत शेतकऱ्याने आपल्या चार मुलींच्या लग्नासाठी अनेक बँकेचे कर्ज काढले आहे. मयत शेतकऱ्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा पत्नी असा परीवार आहे. पुढील तपास देवणी पोलिस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..