उदगीर उपजिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत कोविड १९ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
उदगीर उपजिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत कोविड १९
लसीकरण मोहीमेचा शुभारंभ
लातूर,दि.१६(प्रवीण कांबळे)
संपूर्ण राज्यात बहु चर्चित कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. याच अनुषंगाने उदगीर उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 च्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत डॉ. आरती वाडेकर व डॉ. अश्रूबा जाधव यांना ही लस देऊन करण्यात आला.
यावेळी जि.प. अघ्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, बसवराज पाटील नागराळकर, उदगीर पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, सिघ्देश्वर पाटील ,दिलीपराव देशमुख तसेच उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरीदास, डॉ.शशिकांत देशपांडे, डॉ.दत्तात्रय पवार इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment