बुद्धाचे तत्वज्ञान व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला पुढे नेत .भंते उपगुप्त महाथेरो
बुद्धाचे तत्वज्ञान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला पुढे नेतील- भंते डॉ. उपगुप्त महाथेरो
हिंगोली(प्रतिनिधी)
देशात सुख-समृद्धी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाचे तत्वज्ञान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे त्याशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही असे प्रतिपादन भते डॉ. उपगुप्त यांनी केले.
हिंगोली शहरालगतच्या शांतीनगर अंधारवाडी येथे १२ फेब्रुवारी रोजी १९ वी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले.
धम्म परीषदेचे उद्घाटन भदंत डॉ. उपगुपत महास्तवीर यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी भदंत धम्मसेवक महास्तवीर हे होते.
उद्घाटनपर भाषणात पुढे बोलताना भन्ते उपगुप्त म्हणाले की भारत देश हा विविध जाती-धर्म आणि भाषा असलेला देश आहे.परंतु सध्या या देशात धर्माच्या नावावर अशांतता निर्माण करून सत्ता कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.,परंतु हे जास्त दिवस चालणार नाही भारत देशाला खरोखरच जगात महासत्ता करायचे असेल तर खऱ्या अर्थाने तथागत भगवान गौतम बुद्धाचे तत्वज्ञान आत्मसात करावे लागेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परिवर्तनशील विचार अमलात आणणे गरजेचे आहे,त्याशिवाय देशाचा विकास होणार नाही असेही ते म्हणाले. , अध्यक्षीय समारोपात भंते, धम्मसेवक यांनी भगवान बुद्ध यांनी सांगितलेले पंचशीला चा मार्ग हा संपूर्ण विश्वातील मानव जातीसाठी कल्याणकारी आहे . बुद्धाला विसरून माणसाला माणसाचे जीवन जगता येणार नाही म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सर्वांनी बुद्धाचे मनन चिंतन करणे गरजेचे आहे. बुद्धाच्या विचारावरच जगातील सर्वच देशाचे कामकाज चालते त्या विचारा विरुद्ध कृत्य केल्यास अशा व्यक्तीस शिक्षा ठोठावली जाते. थोडक्यात शील समाधि, प्रज्ञा, अष्टांगिकमार्ग, आणि सदाचार याच तत्वज्ञानावर , सर्व मानव जातीचे कल्याण आहे हे सर्वांनी आत्मसात करावे त्याशिवाय मानवजातीचे कल्याण होणार नाही.
शांतीनगर अंधारवाडी भागात, कालकथित भंते काश्यप महाथेरो यांच्या प्रयत्नाने मागील १८ वर्षापासुन बौध्द धम्म परिषदा होत आहेत. त्याच अनुषंगाने १२ फेब्रुवारी रोजी भंते पय्यारतन थेरो यांच्या संयोजना खाली धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जेतवन बुध्द विहार येथे पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू डॉ. खेमध्धमो व भिक्खूसंघाच्या उपस्थितीत झाले. पु. भिक्खु धम्मबोधी थेरो, भन्ते प्रज्ञापाल, भिक्खु मुदितानंद थेरो, भन्ते काश्यप महाथेरो, भन्ते इंदवंश महाथेरो, भन्ते करुणानंद थेरो, भन्ते विनयबोधी प्रिय थेरो, भन्ते खेमधम्मो महाथेरो, भन्ते ज्ञानरक्षित यांनी दुसरा दिली.
परिषदेस महाउपासक डॉ. एस. पी.गायकवाड , जि.प.अध्यक्ष गणाजी बेले मधुकर मांजरमकर ,यशवंत उबारे, आदींची उपस्थिती होती. धम्मदेसनेनंतर शाहिर दिणकर लोणकर यांच्या संचलनात भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला . प्रस्तावित बनते पय्यारतन यांनी केले
संचलन प्रकाश इंगोले यांनी केले तर आभार नंदकिशोर कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जी. के. इंगोले, अंबादास वानखेडे,जे.एम.शेवाळे प्रभाकर डोंगरे, सुधाकर काशीदे, दांडेकर,सुप्रिया महिला मंडळ,युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment