निलंग्यात आरोग्य विभागाच्या कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण
निलंग्यात आरोग्य विभागाच्या कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण
निलंगा,दि.१६(मिलिंद कांबळे)
येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राट बेसवर काम करीत असलेल्या बारा(१२)कामगारांना गेल्या दहा महिन्या पासून वेतन मिळाला नसल्याने दि.१६ फेब्रुवारी पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,सन ऑक्टोबर २०१८ पासून उदगीर येथील स्वर्गीय अब्दुल कादरी मे.मेडिकल अँड रिचर्च सेंटर उदगीर जिल्हा लातुर या संस्थेमार्फत येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन पुरुष व ०९ महिला मासिक (३०००) तीन हजार एवढ्या तुटपुंज्या पगारावर काम आहेत.
कोविड १९ या महामारीच्या काळातही आपला जीव धोक्यात घालून अखंडित सेवा देऊनही मागील दहा महिन्यापासून एक रुपयाही वेतन मिळाला नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने न्याय मागण्यासाठी उपोषण करीत आहेत.
त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे.की,मागील दहा महिन्यापासून वेतन नाही मिळाल्याने अनेकवेळा संमंधितांशी विचारपूस करून वेतन मागितले असतांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने आर्थिक ओढातांनीमुळे शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तात्काळ वेतन मिळवून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.
दिलेल्या निवेदनावर सारिका माधव कांबळे,हौसाबाई रंगराव कांबळे,लक्ष्मीबाई दत्ता कांबळे,गंगू केशव धैर्य,अलका डिगंबर कांबळे,संगीता बाळू उकळे, जयश्री परमेश्वर हणमंते,गंगुबाई सटवाजी गायकवाड,कमळाबाई तुकाराम हणमंते,अभंग नागबसप्पा मूळे,असिफ चाँद शेख ,अजय दत्तात्रय कांबळे इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment