क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

फोनवर मोठ्याने  बोलू नको म्हणणे पडले महागात

निलंगा,दि.२० (प्रतिनिधी) 

आम्हाला फोनवर मोठ्या आवाजाने बोलण्यास विरोध का ? करतोस या क्षुल्लक कारणावरून  दहा जणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे  बामणी गावात घडली असून याबाबत मयत तरुणाची बहिण सुनिता अर्जून रणदिवे रा जेवळी ता जिल्हा उस्मानाबाद यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून खुनाच्या गुन्ह्यासह अनेक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा शहरापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बामणी गावातील वस्तीशेजारी  कॅनल आहे या कॅनल वर एक पूल आहे.या पुलावर बसून येथील काही तरुण  मोबाईल फोनवर मोठ-मोठयाने बोलणे,मोठ -मोठ्याने ओरडणे,मोठ-मोठ्याने हसणे आरडा-ओरड करणे असा प्रकार नेहमीच  करीत असत.

याच कारणावरून मयताचा भाऊ  विक्रम शिंदे  व गावातीलच बापू उर्फ़ विजय ढाले ,शाम गायकवाड,राम हणमंत गायकवाड अरविंद गायकवाड यांच्या सोबत १५ दिवसांपूर्वी वाद झाला होता.परंतु त्यावेळी तक्रार देण्यात आली नव्हती. दि१९ फेब्रुवारी रोजी याच कारणावरून रात्री ०८ वाजण्याच्या सुमारास मयत जगन्नाथ शिंदे  याला गावातीलच राम हणमंत गायकवाड याने हाक मारून बोलावून घेतले होते. व गावातील बापू उर्फ़ विजय ढाले,हाणमंत गायकवाड,राम हाणमंत गायकवाड,गोरख हाणमंत गायकवाड,अरविंद नामदेव गायकवाड,
शशीकांत उर्फ़ अरविंद गायकवाड,मल्हारी रंगराव गायकवाड,दिंगबर परमेश्वर गायकवाड,शंभो मल्हारी गायकवाड,शाम नारायण गायकवाड. सर्व राहणार बामणी ता.निलंगा जि.लातूर यांनी मारहाण केल्याने मयताची बहीण सुनीता अर्जुन रणदिवे यांच्या फिर्यादी वरून वरील लोकांच्या विरोधात निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा.रजी.नं.००५५/२०२१ कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६,३३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून .पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल चोरमले करत आहेत.

निलंगा लोकलढा समितीच्या आवाहनाला यश

दरम्यान सदर घडलेला प्रकार तालुक्यासह जिल्ह्यात पसरला या घटनेची दखल घेऊन विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निलंगा शहर गाठले व येथील पोलीस ठाण्या समोरील रस्त्यावर ठिय्या मांडला व आरोपीला अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत रास्ता रोको केला.सदरचा रास्ता रोको जवळपास दोन ते अडीच तास चालला होता.

या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव ,डी वाय एस  पी दिनेशकुमार कोल्हे हे निलंगा पोलीस ठाण्यात सकाळपासूनच ठाण मांडून होते.

याबाबतची माहिती येथील लोकलढा समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व येथील आंदोलन कर्त्याशी चर्चा केली व त्यांचे मनपरिवर्तन करून तुमचा लढा पोलीस प्रशासनाशी आहे  येथील नागरिकांना  वेठीस धरू नका असे आवाहन केल्याने आंदोलन कर्त्यांनी पत्रकार मोहन क्षिरसागर यांच्या विनंतीला मान देऊन रास्ता रोको बंद करून रस्ता नागरिकांना खुला करून देऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली.

यामुळे या प्रसंगी तरी येथील रहदारी व नागरिकांना होणारा त्रास थांबाला.यामुळे सुज्ञ नागरिकांतुन पत्रकार मोहन क्षिरसागर यांचे अभिनंदन केले जात आहे

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..