लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निवासस्थाना समोर आंदोलन
आश्विनी सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्र्याच्या घरासमोर आंदोलन
लातुर,दि,१७ (मिलिंद कांबळे)
लातुर जिल्ह्यात बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून सरकारही या घटनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी ब्लू पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साधुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात लातुरचे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील गडीवरील निवासस्थानी दि,१६ रोजी आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,मौजे साकोळ शिरूर अनंतपाळ येथील बौद्ध तरुणीआश्विनी सूर्यवंशी ही लातूर येथे एल एल बी चे शिक्षण घेत होती. तिची हत्या होण्यापूर्वी तिने तिच्या चुलत्याला येथील दोन मूले सतत त्रास देत असल्याचे फोनवरून सांगितले होते चूलत्याने लगेच फोन करून त्या मुलांना त्रास का देता म्हणून फोनवर बोलल्याने त्यांचा राग अनावर झाला की काय या जातीयवादी नाराधमाणे दुसऱ्याच दिवशी अश्वनीची हत्त्या करून प्रेत रेल्वेपटरीवर आणून टाकले मयत तरुणी चे दोन टूकडे आढळून आले हे सर्व त्यांच्या वडीलाने भावाने सांगीतले.
या प्रकरणी एका आरोपीस पकडले आहे दूसरा फरार आहे त्याला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे मौजे कार्ला ता औसा जिल्हा लातुर येथील सूधिर कांबळे या तरूणाला फासी देऊन मारण्यात आले त्याच्या खूनाची चौकशी करण्यात यावी लातूर जिल्हामधे मोठ्या प्रमाणात खून जातीयवाद वाढलेला आहेत.याबाबत लातुर जिल्हाचे पालकमंत्र्यानी निःपक्षपाती चौकशीचे आदेश द्यावेत न्याय नाही मिळाल्यास जिल्यात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साधुभाऊ गायकवाड यांनी सांगितले.
Comments
Post a Comment