बुद्धाचे विचार जगासाठी तारक : भंते पय्यानंद
- Get link
- X
- Other Apps
बुध्दाचे विचार जगासाठी तारक - भिक्खु पय्यानंद
लातुर,दि,२९(मिलिंद कांबळे)
तथागत बुध्द भारतभुमीचे सर्वोत्तम सुपुत्र आहेत.त्यांच्या विचारांचे अनुसरन समस्त मानवजातीचे कल्याण करणारे आहे.म्हणुनच तथागत बुध्दाचे विचार जगासाठी तारक आहेत. असे प्रतिपादन पूज्य भिक्खु पय्यानंद यांनी केले.
बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॕरिटेबल ट्रस्ट या धार्मिक संस्थेद्वारे महाविहार धम्म संस्कार केंद्र,सातकर्णी नगर बार्शी रोड लातुर येथे फाल्गुन पोर्णिमेच्या निमित्तानं धम्मदेसना कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कोविड -१९ कोरोना विषाणू प्रार्दुभाव वाढत असताना अगदी मोजक्याच लोकात फाल्गुन पोर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक भिक्खु पय्यानंद बोलत होते.
कोरोनामुळे मानवजातीत शारीरिक अंतर पडले आहे.हे वर्तमान वास्तव असले जरी.तरी देखील परंतु अहंकार,द्वेष ,तिरस्कार,लोभ,मोह,वासना अशा मानसिक विकारामुळे मानव समाजात सामाजिक अंतर प्राचीन काळापासून पडलेले आहे.तेव्हा हे सामाजिक भेदाचे अंतर कमी करण्यासाठी बुध्दाचे विचार उपयोगी आहेत.याशिवाय कोरोना प्रार्दुभाव थांबविण्यासाठी सर्वांनी शासन नियम पाळावेत असे आग्रही विचार भंतेजीनी आपल्या धम्मप्रवचनात मांडले आहे.यावेळी पू.भिक्खु यशकाश्यपायन महाथेरो यांनीही फाल्गुन पौर्णिमेचे महत्व सांगत विस्तृत धम्म देसना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुजा करण्यात आली.सुत्रसंचालन प्रा.देवदत्त सावंत यांनी केले तर आभार अनिरुध्द बनसोडे यांनी मानले.यावेळी सुधाकर कांबळे,गुंडु सातपुते,पंडीत सुर्यवंशी,डॉ.अरुण कांबळे,मुकुंद हालसे आदीजन उपस्थित होते..
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment