वंचितच्या तालुका अध्यक्षपदी भरत गायकवाड
वंचित बहुजन आघाडीच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी भरत गायकवाड
निलंगा ,दि.२४,मोहन क्षिरसागर
गेल्या दोन वर्षा पासून रिक्त राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी भरत गायकवाड यांची निवड करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे नुतून लातुर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांचा निलंगा येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ही निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमनाथ कांबळे(मुदगडकर) हे होते. यावेळी सर्वानुमते वंचित बहुजन आघाडीच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी भरत गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याच बरोबर निलंगा तालुक्यातील अनेक रिक्त असलेल्या विविध पदावर अनेक कार्यकर्त्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे सुनील सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष,देवदत्त सूर्यवंशी निलंगा तालुका महासचिव ,शिवदत्त गुंजोटे, नागेश कांबळे तालुका संघटक,विजय उस्तुरे तालुका उपाध्यक्ष, बलभीम सूर्यवंशी जिल्हा संघटक,बालाजी कांबळे जिल्हा सल्लागार, यांच्या निवडी करण्यात आल्या.
याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांचा तालुक्याच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अनेकांची समयोचित भाषणे झाली.यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष युवराज जोगी महिला जिल्हाध्यक्षा सौ सुजाता अजनीकर,डॉ.अजनीकर ,गौतम कांबळे,माने मॅडम,शितल भोसले,विजयकुमार सूर्यवंशी, इत्यादिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
मोहन क्षिरसागर, निलंगा
मो .9421377707
Comments
Post a Comment