अभय साळुंके यांनी साधला कोरोना बाधितांशी संवाद


निलंगा /प्रतिनिधी 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेवरून काॅग्रेसचे युवानेते अभय साळुंके यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना परिस्थिती व दवाखाना प्रशासनाच्या आडचणी जाणून घेत थेट कोरोना वार्डात जाऊन तेथील सर्व रुग्णांशी संवाद साधत मानसिक आधार देण्याचे काम केले. निलंगा शहर व तालुक्यात मागच्या दिड महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने झाल्याने रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत असताना शासकीय रुग्णालयात दाखल होत असल्याने त्याचा ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी दवाखाना प्रशासनाची दमछाक होत आहे. येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख शिरूर अनंतपाळ देवणी तालुक्यात दौरा केला, त्यांच्या आदेशाने युवानेते अभय साळुंके यांनी रविवार (दि २७) रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिक्षक डॉ दिलीप सौंदाळे, डॉ प्रल्हाद साळुंके, डॉ दिनकर पाटील यांच्याशी चर्चा करून आडचणी जाणून घेतल्या. रुग्ण गंभीर अवस्थेत येत असल्याने मोठ्या प्रमाणात आॅक्सिजनची गरज भासत आहे. आॅक्सिजन बेड व कर्मचारी वर्ग वाढवणे व काल पासुन कांही मेडिसीन तुटवडा जाणवत असल्याने डॉ सौंदाळे यांनी सांगितले. तेव्हा साळुंके यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लवकरच उभारण्यात येत असलेल्या आँक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या संदर्भात आढावा घेतला व तात्काळ निवासी जिल्हाधिकारी ढगे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत तात्काळ मेडिसिन व आॅक्सिजनची व्यवस्था करावी अशा सुचना दिल्या. व कर्मचारी वाढविण्याबाबत पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करून कर्मचारी वाढविण्यासाठी प्रयत्न करु असे अश्वासन देत कोणतीही आडचण असेल तर आम्ही सोबत आहोत असे सर्व डाॅक्टर्स टिमला आश्वासित केले. त्यानंतर लसीकरणाचा आढावा घेऊन थेट कोविड वार्डात जाऊन तेथील रुग्णांशी संवाद साधत आडचणी जाणून घेतल्या. कोरोना संकटाला हिमतीने लढा द्यावा स्वताचा आत्मविश्वास गमवू नका कोणालाच कांही होणार नाही. लवकरच यातून बरे होऊन आपण बाहेर याल असे म्हणत मानसिक आधार देण्याचे काम केले.......

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..