सव्वीस रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरून तहसिलदार गणेश जाधव यांना निलंबीत करा
सव्वीस रूग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरून तहसीलदारांना निलंबीत करा
निलंग्यातील सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषदेत मागणी
निलंगा, दि.०४ प्रतिनीधी
येथील तहसीलदारांनी पाठवलेल्या एकतर्फी अहवालावरून येथील उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना निलंबीत केल्याप्रकरणी तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे व्हेंटीलेटर वापराअभावी आठ दिवसात सव्वीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकाराला सर्वस्वी जबाबदार तहसीलदार असल्याचा आरोप करून तहसीलदार गणेश जाधव यांना निलंबीत करावे अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी निलंगा येथे मंगळवारी दि.०४ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
बाहेरून औषध आणायला लावल्याच्या कारणावरून वैद्यकीय आधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना कोणतीही चौकशी न करता तहसीलदारांनी पाठवलेल्या अहवालावरून जिल्हाधिकारी यांनी निलंबीत केले होते. याबाबत रूग्ण व नातेवाईक यांच्याकडून सदर घटनेबाबत तिव्र संताप व्यक्त होत होता.
निलंबीत केल्यानंतर येथील उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टर न दिल्यामुळे 27 तारखेपासून चार तारखेपर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदारांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवत डॉ. दिनकर पाटील यांचे निलंबन रद्द करून त्यांना परत घ्यावे अशी मागणी करीत त्यानुषंगाने आज सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबनमहाराज रेशमे, रिपाई गटाचे प्रदेश सरचिटणीस विलास सुर्यवंशी, ओबीसी नेते प्रा. दयानंद चोपणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी, प्रबुध्द भारत संघाचे प्रा. रोहीत बनसोडे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अशोकराव पाटील निलंगेकर यांनी निलंबनाच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी यांना धारेवर धरत कोणत्या आधारे तडकाफडकी निलंबन केले याचा खुलासा होणे गरजेचे असून एक तर तज्ञ डाॕक्टर मिळत नाहीत असलेल्या डॉक्टरांना किरकोळ कारणावरून निलंबीत केले जात आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप करून स्वतः जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी व तत्काळ निलंबन मागे घ्यावे अन्यथा आम्हाला पक्षीय पातळीवर दख्खल घ्यावी लागेल असा ईशारा देत डॉ. पाटील यांचे निलंबन येथील खासगी डॉक्टराचे षडयंत्र असून शहरातील खासगी दवाखान्यात कोविड रूग्ण अॕडमिट करून त्यांची सर्रासपणे लुबाडणूक केली जात आहे. येथील खासगी कोविड सेंटरमध्ये कोण तज्ञ डॉक्टर आहे, ज्यांच्या नावावर कोविड सेंटर सुरू आहे तो डाॕक्टर हयात आहे का याचा शोध प्रशासनाने घ्यावा असे अवाहन केले.
यावेळी बोलतांना मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे म्हणाले की, तहसीलदारांनी त्यांचे वरिष्ठ आधिकारी उपविभागीय आधिकारी येथे असतानाही त्यांना कोणतीही कल्पना न देता मनमानी करत चुकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे. यामुळे अशा अत्यावश्यक सेवा काळात डॉ. पाटील यांना निलंबीत करणे भाग पाडले येथील तज्ञ डॉक्टर निलंबीत केल्यामुळे 27 तारखेपासून आजपर्यंत व्हेंटीलेटरवर आॕपरेट करण्यास तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे सव्वीस रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाला सर्वस्वी तहसीलदारास जिम्मेदार धरावे अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी लिंबनमहाराज रेशमे म्हणाले की, अशा संकट काळात रूग्णाना सेवा देण्याची गरज असून चौकशीच्या आधिन राहून हे निलंबन मागे घेण्यासाठी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना आपण जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची तक्रार केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रिपाईचे विलास सुर्यवंशी म्हणाले की, तहसीलदार हे घटनात्मक पद असून अल्पसंख्याक विरोधी ही कारवाई तहसीलदार यांनी कारवाई केली आहे. तहसीलदार उपजिल्हा रूग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असतांना डॉ. दिनकर पाटील यांनी त्यांना व्ही. आय. पी. ट्रिटमेंट दिली नाही या आकसापोटी डॉ. पाटील यांचा चुकीचा अहवाल पाठवला आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी दयानंद चोपणे म्हणाले की, ज्या महाजन मेडिकल वरती तहसीलदारांनी छापा टाकला त्याच मेडीकलवरून तहसीलदारांनी कोरोना पॉझिटिव्ह काळात औषधे घेतली असल्याचीही चर्चा आम्ही ऐकली आहे. त्यामुळे ही कारवाई हस्यास्पद आसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उल्हास सूर्यवंशी म्हणाले की, ही गंभीर असून याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना संपर्क करून माहीती दिली असल्याचे सांगून त्वरीत जिल्हाधिकारी यांच्याकडून माहीती घेऊन कारवाई करू असे अश्वासन दिले असल्याचे सांगितले.
तर वंचितचे युवराज जोगी म्हणाले की, तहसीलदारांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू विक्री सुरू असून जिल्हाधिकारी यांनी धाडी टाकाव्यात अशी मागणी केली.
Comments
Post a Comment