निलंगा तालुक्यात विविध कार्यक्रमांनी बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा.
निलंगा तालुक्यात विविध कार्यक्रमांनी बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुका व तालुका परिसरात लोकनेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांच्या अथक प्रयत्नातून व दुरदृष्टीतुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रामलिंग (मुदगडवाडी) ता निलंगा येथिल एका कोळी बांधवांचे काही दिवसांपूर्वी घर जळून संसार उध्वस्त झाला होता.त्या परिवाराला संसारात अत्यावश्यक असणारी भांडी (साहित्य) देऊन व कोरोना बाबत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून त्यांचा संसार फुलविण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अमोल भाऊ लांडगे(लातुर) ओ.बी.सी. नेते तथा जेष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर,निलेश बनसोडे,विशाल ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे उमरगा तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष बाबुरावजी गायकवाड, यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सौ.लक्ष्मीबाई जोगी,सौ.जोशीला गायकवाड, राम तोतके वंचित बहुजन आघाडीचे सर्वश्री अंकुश गायकवाड,शिवदत्त गुंजोटे, बालाजी(मामा) कांबळे देवदत्त सुर्यवंशी, बालाजी सुरवसे(मुन्ना)माजी सैनिक व्यंकट तरमुडे, मोहन सोनटक्के ,माजी सरपंच सोमलिंग कांबळे दस्तगीर शेख आयुब शेख, शमशोद्दीन जमादार, वजीर शेख, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकट शिंगे, दत्ता पेटकर अरिफ पठाण,ह भ प शंकर मोतीबने(महाराज)सुनील कावाले ,प्रकाश गायकवाड ,संजय तरमुडे, ज्ञानेश्वर जोगी, लक्ष्मण कांबळे, विठ्ठल कोल्हे,उपस्थित होते.
यावेळी रामलिंग मुदगड येथील आरोग्य उपकेंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.तद्नंतर कोरोना प्रादुर्भावच्या या बिकट काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणाऱ्या कासार सिरसी(तालुका निलंगा)येथील पोलिसांना मास्क व सॅनिटाईजर वाटप करून बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस अत्यंत साध्य पद्धतीने साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment