रामलिंग मुदगड येथे कोविड१९ लसीकरण यशस्वी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नाला यश

रामलिंग मुदगड येथे कोविड लसीकरण यशस्वी

वंचितच्या पाठपुराव्याला  यश

निलंगा /प्रतिनिधी

कोरोना महामारीने सर्व जगात थैमान घातल्याने सर्व नागरिक अस्वस्थ आहेत.अनेकजण भयभीत झाले आहेत. ग्रामीण भागात तर उपचारा अभावी,व भीतीपोटी अनेजन मृत्युमुखी पडत आहेत.

मात्र अश्या या कठीण प्रसंगी गावातील जनता सुखी रहावे याकरिता मौजे रामलिंग मुदगड ता निलंगा जिल्हा लातूर या गावातील एक युवक वंचित बहुजन  आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी मात्र या महामारीपासून गावातील तालुक्यातील जनता सुखी राहावे या करिता नेहमीच प्रयत्नशील असतो.

या लसीकरणासाठी त्यांनी अनेकवेळा जिल्हाधिकारी, लातुर,उपविभागीय अधिकारी निलंगा, तालुका आरोग्य आधिकारी  यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क करून गावात कोविड १९ लसीकरणा साठी पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याला दि.१३मे रोजी यश आले व आरोग्य विभागाचे येथील उपकेंद्राचे डॉ.महेश चेंडकापुरे  यांनी त्यांच्या टीम सह सकाळी १० वाजता हजर राहून लसीकरण केले.

तत्पुर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर, परिचारिका,गावातील आशा कार्यकर्त्या ,गावातील प्रमुख नागरिक अर्थात सरपंच, उपसरपंच, व जेष्ठ नागरिकांचे  गुलाबपुष्प देऊन स्वागत  करण्यात आले.

यावेळी प्रथमलस घेण्याचा मान गावातील व्यंकट रेड्डी यांना मिळाला.यावेळी लसीकरणाला येणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती.तर यावेळी चहा,बिस्केट,पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही  करण्यात आली होती.

या वेळी गावातील १२० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. वंचितच्या या प्रयत्ना बद्दल गावातील नागरिकांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंचितचे तालुका अध्यक्ष भरत गायकवाड,शाहू कांबळे,दशरथ मुळे,महेश गड्डे,बापूराव पाटील,बळी कारागीर, गोटपाल बिराजदार,शमशोद्दीन जमादार,प्रेमनाथ गायकवाड विष्णू गोचडे,शिवा बेवनाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

     By

M. B. Kamble

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..