शांतीचा महामंत्र देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध हे शांतीचे अग्रदूत
शांतीचा महामंत्र देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध हे शांतीचे अग्रदूत
लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे
लातुर: दि. २८ - लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) येथे मंदार वरील समाज मंदिरात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सामाजिक अंतर पाळून तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या चरणी अभिवादन करून पुष्पअर्पण करण्यात आले. या प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे ही पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करून बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना सामूहिकरीत्या घेण्यात आली.
या जयंतीच्या निमित्ताने लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आपले विचार व्यक्त केले. तथागत गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे पासष्ठवी जयंती साजरी करत असताना तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा महामंत्र हा आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत उपयोगाचा असल्याचे प्रतिपादन पनाळे यांनी केले.
तथागत गौतम बुद्ध हे शांतीचे अग्रदूत होते, असेही लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले.
सध्या संपूर्ण जगामध्ये कोविडच्या महामारीमुळे समग्र मानव जात भीतीदायक वातावरणात आहे. आणि या भीतीमुळे निराश वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे सर्व मानवांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये युवकांनी समोर येऊन आधार देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन व्यंकटराव पनाळे यांनी केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भगवान भालेराव, सुनील कांबळे, शाहीर उत्तमराव कांबळे, संतोष पनाळे, नागेश कांबळे, बापुराव भालेराव, किरण लोंढे, राजेंद्र भालेराव, पवण सरवदे, आलिम शेख, यांच्यासह बौद्ध उपासक व उपासीका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी केले, तसेच उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. कोरोना प्रादुर्भाव नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती कार्यक्रम पार पडला.
Comments
Post a Comment