निलंग्यात वंचित बहुजन।आघाडीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

निलंग्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

निलंगा,दि.३१(रोहित झरीकर)

निलंग्यात राजमाता कर्मयोगिनी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६  वी  जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोविड १९ च्या नियमांचे पालन करून अत्यंत उत्साहात  साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वंचितचे तालुका अध्यक्ष भरत गायकवाड यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण  करण्यात आला तद्नंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस येथील अनेक मान्यवरांच्या हस्ते  पुष्पहार व पुष्प अर्पण  करण्यात आले.

 येथील शिवाजी चौकात  अश्वारूढ असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष  युवराज जोगी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिवाजी चौक निलंगा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पन करून फटाक्यांच्या अतिष बाजीने अहिल्यादेवीच्या जयघोषात जयंती उत्सव अत्यंत आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर अनेक मान्यवरांनी  प्रकाश टाकला. यावेळी येथील जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर,पत्रकार मिलिंद कांबळे,माजी सैनिक व्यंकट तरमुडे,शिवदत्त गुंजोटे,विजय उस्तुरे,प्रदीप सोनकांबळे,देवदत्त सूर्यवंशी,मुन्ना सुरवसे,रोहन सुरवसे, बालाजी कांबळे,विजयकुमार सूर्यवंशी, मोहन सोनटक्के,दस्तगिर शेख,विजय माडजे,प्रमोद सुरवसे,बळवंत सरवडे,आकाश काळे,महेश गड्डे, चंदू म्हेत्रे,नरसिंग दुदभाते,संजय तरमुडे,दत्ता दुदभाते,शिवा सूर्यवंशी,अंकुश कांबळे यांच्यासह  तालुका व तालुका परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..