महाबीजचे बियाणे बाजारात तात्काळ उपलब्ध करून द्यावे : प्रा. अण्णासाहेब मिरगाळे

महाबीजचे बियाणे बाजारामध्ये तात्काळ उपलब्ध करून द्यावे

प्रा.आण्णासाहेब मिरगाळे.

 निलंगा:,दि०२ (रोहित कांबळे)

निलंगा तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची मागणी ही महाबीज बियाण्याला आहे. परंतु सध्या बाजारामध्ये व्यापाऱ्याकडे महाबीज बियाण्याची  मागणी केली असता व्यापारी हे आमच्याकडे महाबिज बियाणे शिल्लक नाही असे सांगतात. कृषी दुकानदाराकडे महाबीज  सोडून दुसऱ्या कंपनीचे अनेक बी बियाणे आहेत त्याची किंमत साडेतीन हजार प्रति ब्याग असल्यामुळे शेतकऱ्यांना ते  बियाणे परवडत नाही. शासनाचे महाबीज हे बियाणे बावीसशे पन्नास रुपयाला प्रति ब्याग असल्यामुळे ते बियाणे शेतकऱ्यांना घेण्यास परवडते. त्यामुळे मा. तालुका कृषी अधिकारी यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ महाबीज बियाणे बाजारामध्ये उपलब्ध करून द्यावे.
जर कोणता व्यापारी बी-बियाणे, खते याची साठवणूक करून काळाबाजार करत असेल तर आपण याची चौकशी करावी,अशी मागणी युवासेनेचे  उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यानी तालुका कृषी अधिकारी श्री. काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..