महाबीजचे बियाणे बाजारात तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी
महाबीज बियाणे बाजारामध्ये तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी
निलंगा,दि,०२
अनेक शेतकऱ्यांची पसंदी असलेले महाबीजचे बियाणे तालुक्यात तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अण्णासाहेब मिरगाळे
यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाजारामध्ये व्यापाऱ्याकडे महाबीज बियाण्याची मागणी केली असता व्यापारी आमच्याकडे महाबिज बियाणे शिल्लक नाही असे सांगतात. कृषी दुकानदाराकडे महाबीज सोडून दुसऱ्या कंपनीचे अनेक बी बियाणे आहेत त्याची किंमत साडेतीन हजार प्रति बॅग असल्यामुळे शेतकऱ्यांना ते बियाणे परवडत नाही. शासनाचे महाबीज हे बियाणे बावीसशे पन्नास रुपयाला प्रति बॅग असल्यामुळे ते बियाणे शेतकऱ्यांना घेण्यास परवडते. त्यामुळे मा. तालुका कृषी अधिकारी यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ महाबीज बियाणे बाजारामध्ये उपलब्ध करून द्यावे.जर कोणता व्यापारी बी-बियाणे, खते याची साठवणूक करून काळाबाजार करत असेल तर आपण याची चौकशी करावी,अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment