वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पी.एस.आय गोविंद राठोड यांचा सत्कार

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पी.एस.आय.गोविंद  राठोड यांचा सत्कार

निलंगा,दि.०५ मे २०२१

पोलीस खात्यात असूनही सर्व जातीधर्मातील जनतेला व  समाजातल्या शेवटच्या माणसाना हवेहवेसे वाटणारे ज्यांची नुकतीच पी.एस.आय पदी पदोन्नती झालेले गोविंद राठोड यांचा आज निलंगा येथे  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

तत्पूर्वी  नवनिर्वाचित पी.एस.आय गोविंद राठोड यांनी व वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष युवराज जोगी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष भरत गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

त्यानंतर आयु.गोविंद राठोड साहेब यांचा शाल,फेटा,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी युवराज जोगी,भरत गायकवाड,विजय उस्तुरे,बालाजी टेलर,शिवदत्त गुंजोटे,ऍड.अमीर शेख,मोहन सोनटक्के,अंकुश गायकवाड,बालाजी कांबळे,प्रदीप सोनकांबळे,देवदत्त सूर्यवंशी,भारतबाई कदम,मोहन कदम,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा प्रवक्ता सत्यवान शिंदे,भीम शक्तीचे युवा नेते मुन्ना सुरवसे,रोहन सुरवसे,बाबू तीलगुरे,प्रशांत बनसोडे, तात्येराव कांबळे,आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..