बहुजन समाजाला वंचित बहुजन आघाडीच न्याय देऊ शकते

बहुजन समाजाला  वंचित बहुजन आघाडीच न्याय देऊ शकते
  
           -युवराज जोगी

लातुर,दि.०५(मिलिंद कांबळे)

वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची निर्मिती झाल्यापासून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये विविध समाजातील घटकातील नागरिकांच्या प्रश्नावर सतत लढत आली आहे. कामगारांचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी ही आज खऱ्या अर्थाने लढत आहेत.

राज्यात कुठलीही सत्ता नसताना ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे  बहुजन समाजाच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,वंचितांच्या ज्वलंत प्रश्नावर लढत आहेत. असे मत वंचित बहुजन आघाडीचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांनी व्यक्त केले.

ते निलंगा येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.व सत्कार करण्यात आला यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

तत्पूर्वी भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

याप्रसंगी बोलतांना ते पुढे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता  नांदावी यासाठी अविरत पणे लढा दिला.परंतु त्यांच्या हयाती नंतर या देशातील वंचित घटकाला येथील व्यवस्थेने वंचितच ठेवल्याने वंचित समूहाचा विकास खुंटलेला आहे.

त्यांच्यावर शैक्षणिक आर्थिक,सामाजिक अन्याय झालेला आहे. होत आहे त्यांचा खुंटलेला विकास करण्यासाठी त्यांच्यावरील होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी वंचितचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे देखील आज अविरतपणे प्रयत्न करीत आहेत.

यावेळी ते पुढे म्हणाले की,शेकडो वर्षांपासून विकासाच्या कोसो दूर असलेल्या धनगर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी माझ्यासारख्या मेंढ्या राखणाऱ्याच्या जीपचा ड्रायव्हर असलेल्या  पोराला आज जिल्हयावर महत्वाचे पद देऊन खऱ्या अर्थाने न्याय दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष भरत गायकवाड, विजय उस्तुरे,बालाजी टेलर,शिवदत्त गुंजोटे, ऍड.अमीर शेख,मोहन सोनटक्के,अंकुश गायकवाड, बालाजी  कांबळे प्रदीप सोनकांबळे,देवदत्त सूर्यवंशी, भारतबाई कदम,मोहन कदम,गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा प्रवक्ता सत्यवान शिंदे,भीम शक्तीचे युवा नेते मुन्ना सुरवसे,रोहन सुरवसे,बाबू तीलगुरे,प्रशांत बनसोडे, तात्येराव कांबळे,आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..