कांबळे परिवाराने बैलावर केले अंतीमसंस्कार

कांबळे परिवाराने बैलावर केले अंतिमसंस्कार

निलंगा , दि ०३ (प्रतिनिधी)

येथील अशोकनगर भागात राहणारे दैनिक सम्राटचे पत्रकार तथा प्राणि प्रेमी मिलिंद कांबळे यांच्या परिवाराने एक नवा आदर्श पायंडा घालून त्यांच्या शेतीवर असलेल्या दोन बैलांपैकी एका बैलाचा दि.०३ जुलै२०२१ वार शनिवार रोजी पहाटे मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

परिवारातील एक व्यक्ती गेल्यासारखे दुःख झाले मात्र मृत बैलाच्या पार्थिवदेह त्यांच्या स्वतःच्या शेतीत दफन करून अंतिमसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी,तालुका अध्यक्ष भरत गायकवाड,पत्रकार मोहन क्षिरसागर,प्रदीप सोनकांबळे(विधिकर्ते) देवदत्त सूर्यवंशी शिवसेनेचे सुरेंद्र महाराज,भिमशक्तीचे मुन्ना सुरवसे,दयानंद कांबळे,नागनाथ कांबळे,आदित्य कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिवार परिवारातील सर्व नातेवाईक उपस्थित होते.
कांबळे परिवाराने गौतम बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे पशु पक्षावर प्रेम करा प्राणी मात्रावर दया करा याला अनुसरून स्वतः च्या शेतावरील दोन बैलांना कसायाला न विकता आजपर्यंत तब्बल २२वर्षे घरातील व्यक्तिप्रमाणे सांभाळ केला मात्र वृद्धापकाळाने एक बैल राजा यांचे निधन झाले.यामुळे असा आदर्श सर्व शेतकरी बैल मालकांनी घ्यावा अशी चर्चा निलंगा पंचक्रोशी मध्ये होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..