निलंग्यात मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
मुख्यमंत्र्याचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
निलंगा,दि २७ जुलै २०२१
निलंगा तालुक्यात शिवसेना व युवासेनाच्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
महाविकास आघाडी च्या सर्व नेत्यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व नेत्याच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तीन हजार मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक कॉलनी रोडच्या रस्त्याची दुरुस्तीकरण शिवसेना व युवासेना च्या माध्यमातून करण्यात आले. त्याप्रसंगी सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.यावेळी 6000 वृक्षांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सात वाजता सर्व महाविकास आघाडीच्या नेत्याच्या उपस्थित मा. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला.
रक्तदान शिबिराप्रसंगी विनोदजीआर्य, प्रा.दयानंद चोपने, पंडितराव धुमाळ, अविनाश दादा रेशमे, विलास सुर्यवंशी, शिवचरण पाटील, ईश्वर पाटील, धम्मानंद काळे,इस्माईल लदाफ,हरिभाऊ सागरे, बालाजी माने, असगर अंसारी, मुस्तफा शेख, प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वांजरवाडे, सुनील नाईकवाडे, रेखाताई पुजारी, महेश देशमुख, समद लालटेकडे, शाहूराज फटे, सतीश फटे, प्रसाद मठपती इत्यादी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिवसेना, युवासेना महिला आघाडी इत्यादी सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश धायगुडे, बाळू दिगंबरे, सतीश रुपनर, अभिजीत लांडगे, अजय वावरे, शुभम डांगे, सादिक पठाण, बलभीम कांबळे, बजरंग कांबळे,सोनु वाघमोडे यांनी प्रयत्न केले.
Comments
Post a Comment