क्रांती कांबळेला सुवर्णपदक जाहीर

क्रांती कांबळेला सुवर्णपदक जाहीर 

लातुर, दि,२९ 

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सन 2019- 2020 या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेत विद्यापीठ स्तरावर दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकासाठी उस्मानाबाद येथील क्रांती पंडित कांबळे ही पात्र ठरल्याचे  विद्यापीठाने जाहीर केले आहे.

क्रांती कांबळे ही विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय( वनामकृवि) लातूर येथून बीएससी ऍग्री बायोटेक्नॉलॉजी( कृषी जैवतंत्रज्ञान) शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. ती चारही वर्षे महाविद्यालयातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.एकूण गुण( सीजीपीए) 8.94 घेऊन ती प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह विद्यापीठातून प्रथम आली आहे. 

तिला सुवर्णपदक (सुवर्ण मुलामित ) व गुणवत्ता प्रमाणपत्र 23 व्या दीक्षांत समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी कळविले आहे.या यशाबद्दल क्रांती कांबळे हिचे सर्व शिक्षक, कुटुंबीय नातेवाईक ,आप्तेष्ट यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
           
                        
           

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..