पत्रकार द्रोणाचार्य कोळींना संरक्षण देण्याची मागणी

मौजे कोकळगाव ता निलंगा जिल्हा लातुर  येथील पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निलंगा येथील पत्रकार व संभाजी ब्रिगेडच्या  वतीने निषेध करून  उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदनाद्वारे कोळी यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,निलंगा तालुक्यातील मौजे कोकळगाव येथील पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांच्यावर अवैद्य दारूची व गुटख्याची बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरून काही अवैद्य धंदे करणाऱ्या समाजकंटकांनी कोळी यांच्या  घरावर मध्यरात्रीच्या वेळी दगडफेक करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
 
सदरचा प्रकार हा  अतिशय निंदनीय आहे.अश्या प्रकाराला वेळीच लगाम लावला नाही तर अवैद्य अवैद्य धंदेवाले डोके वर काढून अश्या प्रामाणिक पत्रकारांचे जगणे मुश्किल करतील या बाबीची दखल घेऊन येथील सुज्ञ पत्रकार व संभाजी ब्रिगेडच्या वतीने  गुरुवार दि.२९ रोजी उपविभागीय अधिकारी  निलंगा यांना  निवेदन देऊन तात्काळ गुन्हेगारांवर कारवाई करून गजाआड करावे व कोकळगाव येथील पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांना सुरक्षा द्यावी अशी मागणीही  निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की,पत्रकार हा लोकशाहीचा आत्मा अर्थात चौथा स्तंभ आहे आणि जर असे गुंड प्रवृत्तीचे काही लोक स्तंभ उधवस्थ करायचे काम  करीत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही,या प्रकरणी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने वेळीच दखल घेऊन निलंगा तालुक्यातील अवैध धंद्याच्या विरोधात लिहिणाऱ्या सच्चा पत्रकारांवर होत असलेले अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा व त्यांचे रक्षण करावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

 यावेळी ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर, संभाजी ब्रिगेड चे निलंगा तालुका अध्यक्ष प्रमोद कदम उपाध्यक्ष भरत चव्हाण, अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीचे लातूर जिल्हा अध्यक्ष रमेश लांबोटे, पत्रकार विजय देशमुख, जावेद मुजावर, बालाजी कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, प्रशांत साळुंके, गोविंद सूर्यवंशी आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..