काँग्रेसच्या अधिकृत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख
निलंगा, दि १३
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी निलंगा जिजाऊ चौक येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या अडचणी सोडवाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री श्रीशैल्य उटगे, काँग्रेस नेते अभय साळुंखे, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, निलंगा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद शिंगाडे, सचिन दाताळ, प्रवीण सूर्यवंशी, आबाबासाहेब पाटील उजेडकर, सुधाकर पाटील, मालबा घोणसे, अजित निंबाळकर, पंकज शेळके, महेश देशमुख, अजगर अन्सारी, गजानन भोपनिकर, डॉक्टर चांदोरे, सयाजी पाटील, लाला पटेल, सुहास देशमुख, नारायण सोमवंशी, दत्ता देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. देशमुख म्हणाले की, निलंगा तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. निलंगा तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. आगामी काळातील सर्व निवडणुकात काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच नियोजनात्मक पद्धतीने काम करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करावे ते व्हाट्सअप ग्रुप तालुका जिल्हा, राज्य, देशपातळीवरील काँग्रेस पक्षाच्या ग्रुपशी जोडावे. पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यावर कोरोनाचे संकट असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार जनतेच्या सर्वांगिण कल्याणासाठी प्रयत्न करत आहे. लातूर जिल्ह्यासह निलंगा, तालुक्याच्या चौफेर विकासासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
Comments
Post a Comment