पियुष चव्हाण(NMMS) शिष्यवृत्ती परीक्षा ऊत्तीर्ण
जय भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचा इयत्ता 8 वी चा विद्यार्थी चव्हाण पियुष वाल्मिक (NMMS) शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण झाला आहे.
श्री.शामगीर शिक्षण संस्था शिवणी कोतल द्वारा संचलित जय भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बॅंक काॅलणी, दापका ता. निलंगा जि. लातूर येथील इ.8 वी चा विद्यार्थी चव्हाण पियुष वाल्मिक रा.दापका तांडा येथील रहिवासी असून तो " राष्ट्रीय आर्थिक दुर्बलघटक "(NMMS) शिष्यवृत्ती परिक्षा 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्याला 9 ते 12 वी पर्यंत वर्षाला 12000 रू शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेला आहे.
Comments
Post a Comment