महिला पोलीस अधिकाऱ्याची बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

महिला पोलीस अधिकाऱ्याची बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या समस्त निलंगेकरांची मोदींना मागणी

निलंगा,दि.०३

 21 वर्षीय राबिया सैफी या पोलीस महिला कर्मचा - याची अमानुश पणे बलात्कार करुन हत्या करणा - या नराधमास फाशीची शिक्षा अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत मोदींना समस्त निलंगेकरातर्फे देण्यात आले.

 निवेदनात म्हणटले आहे की समस्त निलंगेकरा तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात येते की  21 वर्षीय राबिया सैफी महिला पोलीस कर्मचारी भगीनीच अपहरण व बलात्कार करुन अमानुशपणे तब्बल 50 ठिकाणी चाकुने वार करुन निर्दयीपणे हत्या करणायाची घटना दिल्ली येथे घडली असून सदरील घटनेचा आम्ही समस्त निलंगेकर जाहीर निषेध करतो , सदरील घटना मानुसकीला काळीमा फासणारी असुन या घटनेत चार आरोपी सह 1 महिलाही सहभागी असल्याचे उघडीस आले असुन सर्व आरोपी अद्याप मोक्काट आहेत. 

 सदरील आरोपीना त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी व राबिया सैफी या भगीणीच्या घरच्यांना नुकसान भरपाई व शासकीय नौकरीत समाविष्ठ करुन घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर मुजीब सौदागर, प्रा दयानंद चोपणे,गोविंद सूर्यवंशी, मुस्तफा शेख,सब्दर कादरी,जाकीर शेख,बाबा बिबराले,अमोल सोनकांबळे,शारुख सय्यद,महेबूब शेख,शौकत शेख,सोहेल खादीम,अझहर हाश्मी,उमर फारुख,जाधव परमेश्वर, इस्माईल खुरेशी,फैमान कादरी,अली मणियार,हुसेन चौधरी, अरबाज शेख,नईम खतीब,अझहर पटेल,सुनील सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..