लातुर येथे राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

लातूर येथे राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

लातूर,दि१४

रुरल अँन्ड अर्बन योगा असोसिएशन, लातूर च्या वतीने सन २०२१ लातूर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 दिनांक १९ सप्टेंबर २०२१ वार रविवार रोजी सकाळी ९:०० वाजता पत्रकार भवन, तहसील कार्यालय जवळ, लातूर येथे covid-19 च्या नियमाचे पालन करून स्पर्धा संपन्न होणार आहे.

या योगा स्पर्धा मधे सहभाग घेणाऱ्या खेळाडूला आप-आपल्या गटातील ७ आसने आदर्श स्थिती मधे किमान पंधरा सेकंद स्थिर करता येणे आवश्यक आहे.

६-८,८-१०,१०-१२,१२-१४,१४-१६,१६-१८,१८-२१,२१-२५,२५-३०,३०-३५,३५- ४५ वर्षांवरील(महिला/पुरुष) या स्पर्धा वयोगटा नुसार होतील वयोगटानुसार स्पर्धा मधे कोणती आसने करावयाची याची pdf फाईल संपर्क केल्यास देण्यात येईल तसेच जन्म तारीख पुरावा म्हणून आधार कार्ड,जन्म प्रमाणपत्र छायांकित प्रत व चार पासपोर्ट साईज फोटो सोबत आणाणे अनिवार्य आहे.

 जिल्हा स्पर्धेची नाव नोंदणी स्पर्धा पूर्वी संपर्क करून नोंदवणे आवश्यक आहे. स्पर्धा संबंधित अधिक माहिती साठीव नाव नोंदणी साठी के.वाय.पटवेकर(अध्यक्ष) रुरल अँन्ड अर्बन योगा असोसिएशन,लातूर, मुजीबमिया सय्यद(सचिव) (9270888587/9130960258),स्पर्धा संयोजक अमरदीप पाटील(राज्यस्तरीय पंच), सौ.संजीवनी सबनीस मॅडम(राज्यस्तरीय पंच) 9595474755/9422472001) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..