हैद्राबाद व साकिनाका बलात्कार प्रकरणाचा निलंग्यात निषेध
बलात्कार प्रकरणाचा निलंगा येथे निषेध
निलंगा,दि.१८
हैदराबाद येथे घडलेल्या सहा वर्षीय मुलीच्या व साकीनाका मुंबई येथे 16 वर्षीय मुलींचा वासनांध नराधमांनी बलात्कार करून निर्घृण हत्या केलेल्या अमानवीय घटनेचा निषेधार्थ येथील गोर सेनेच्या वतीने कँडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोर सेना व बंजारा समाजाच्या वतीने येथील पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी गोर सेनेचे तालुकाध्यक्ष आकाश राठोड, यांच्यासह वसंत राठोड ,बालाजी राठोड, केळगाव चे उपसरपंच सुधाकर चव्हाण ,बाबा शेख, अर्जुन जाधव, संजय राठोड गोर सेना व बंजारा समाजाच्या नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
Comments
Post a Comment