निलंगा विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी शिवसेनेच्या वतीने निधीची मागणी
निलंगा विधानसभा मतदार संघाच्या विकासकामासाठी शिवसेनेच्या वतीने निधीची मागणी
निलंगा,दि.०३
निलंगा विधानसभा मतदार संघातील विविध गावामध्ये पानंद रस्ते पाणीपुरवठा अशा अनेक कामासाठी मा जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निलंगा विधानसभेतील शिष्टमंडळ मंत्रालयातील विविध मंत्र्यांना भेट देऊन निलंगा विधानसभेच्या विविध विकास कामासाठी निधीची मागणी करण्यात आली.
त्यात महाराष्ट्र राज्याचे कैबिनेट मंत्री मा.उदय सामंत साहेब, (उच्च व तंत्रशिक्षण, मंत्री महाराष्ट्र राज्य) व मा.गुलाबराव पाटील पाणी पुरवठा कॅबिनेट मंत्री आणि मा.संदीपानजी भूमरे साहेब फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री यांना जिल्ह्यातील विविध विकास कामाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख डॉ. शोभाताई बेंजरगे, निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, शिरूरअनंतपाळ तालुकाप्रमुख भागवत वंगे, बसवराज वलांडे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, शाहूराज फट्टे सुनील नाईकवाडे मुकेश सुडे, लक्ष्मण बिराजदार इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment